नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील त्र्यंबकरोडवर वाहतुकीत मोठा बदल होणार आहे. तशी माहिती नाशिक शहर पोलिसांनी दिली आहे. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने सध्या शहरात जलवाहिनीचे काम सुरू आहे. आता हे काम त्र्यंबकरोडवर करण्यात येणार आहे. त्यामुळेच त्र्यंबकनाका ते मायको सर्कल या दरम्यान हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येत्या १ मार्चपासून या मार्गात बदल होणार आहे. यासंदर्भात नाशिक शहर पोलिसांनी काढलेले प्रसिद्धी पत्रक, पर्यायी मार्ग हे खालीलप्रमाणे