बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या! उद्या, शनिवारच्या वाहतुकीत मोठा बदल… हे रस्ते बंद

by India Darpan
जुलै 14, 2023 | 4:49 pm
in स्थानिक बातम्या
0
traffic signal1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारच्यावतीने उद्या, शनिवारी (१५ एप्रिल) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर होणाऱ्या या समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.

नाशिक शहर पोलिसांनी वाहतूक बदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे उद्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. सकाळी सहा वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीतील हा बदल लागू असणार आहे. असे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे.

या मार्गावर प्रवेश बंदी
मॅरेथॉन चौक ते गंगापूर नाका सिग्नल, गोल्डन जिम ते ठक्‍कर बंगला, जुना गंगापूर नाका सिग्नल ते अहिरराव फोटो स्टुडिओ या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

हा आहे पर्यायी मार्ग
गंगापूर रोडकडून अशोकस्तंभाकडे येणारी वाहने जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स मार्गे मॅरेथॉन चौकात येऊन अशोकस्तंभाकडे जाऊ शकतील, तर अशोकस्तंभाकडून मॅरेथॉन चौकाकडे जाताना जुनी पंडित कॉलनी मार्गे राणे डेअरी व इतर ठिकाणी जाता येईल. गंगापूर रोडने जाणारी वाहने कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड मार्गे इतरत्र जाऊ शकतील.

शहराच्या ६ भागातून बसेसची सुविधा
‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शनिवार १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डोंगरे वसतीगृह मैदानात होणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (एनयूएलएम), पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, समाज कल्याण, महिला व बालकल्याण अशा महानगरपालिकेच्या विविध विभागातील लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी व कार्यक्रम झाल्यावर परत घेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे. मनपाचे सहा विभाग मिळून सिटी लिंक बसेसचे एकूण ५८ पिकअप आणि ड्रॉप पॉईंट असणार आहेत.

शहर वाहतूक सेवा सिटीलिंकच्या एकूण ७५ बसेस धावणार आहेत. कार्यक्रम झाल्यावर त्याच बस मधून लाभार्थ्यांला परत सोडण्यात येणार आहे. प्रत्येक बससाठी दोन संपर्क प्रमुख असणार आहेत. बस क्रमांकसह संपर्क प्रमुखाचे नाव, मोबाईल नंबर बसवर असणार आहे. लाभार्थ्यांनी मनपाने दिलेल्या पिक अप पॉईंटवर १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता हजर राहावे, जेणेकरुन कार्यक्रमाच्या स्थळी वेळेत पोहचता येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

विभागनिहाय पिक-अप पॉईंटची संख्या
नाशिक पूर्व – १०
नाशिक पश्चिम – ८
पंचवटी – १५
नाशिक रोड – ९
नविन नाशिक (सिडको) – ८
सातपूर – ८

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उपस्थितीसाठी मनपाच्या सहा विभागातून नियोजन, लाभार्थ्यांसाठी बसेसचे 58 पिकअप पॉईंट

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शनिवार 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता डोंगरे वसतीगृह मैदानात होणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (एनयूएलएम), पीएम स्वनिधी योजना, pic.twitter.com/5vbbBm9wUi

— mynmc (@my_nmc) July 14, 2023

.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिगो पार्कजवळील जॉगिंग ट्रॅक विकसित करा, अन्यथा जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

Next Post

खाते वाटप होताच अजित पवारांनी घेतली या विभागाची बैठक

India Darpan

Next Post
IMG 20230714 WA0307 e1689333189871

खाते वाटप होताच अजित पवारांनी घेतली या विभागाची बैठक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011