नाशिक – नाशिककरांनो, दिवाळीच्या खरेदीसाठी जर तुम्ही बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी शहराच्या मुख्य बाजारात मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यात वेळ, पैसे आणि इंधन याचा मोठा अपव्यय होतो. याची दखल घेत नाशिक शहर पोलिसांनी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील काही रस्त्यांवर वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२८ ऑक्टोबर) हा आदेश लागू होणार आहे. वाहतूक बंदी असलेले मार्ग, त्यासाठी पर्यायी मार्ग, कालावधी याचे आदेश पोलिसांनी काढले आहेत. हे आदेश असे