सोमवार, ऑक्टोबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक पोलिस करतात काय? चोरीच्या घटनांमध्ये वाढ

सप्टेंबर 23, 2021 | 2:19 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनििधिक फोटो

प्रातिनििधिक फोटो


गंजमाळला भरदिवसा घरफोडी
नाशिक – कुटूंबिय घरात नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे ८६ हजाराचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. ही घटना गंजमाळ भागातील पंचशिलनगर येथे घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा अशोक सावंत (रा.डॉ.आंबेडकर पुतळा मागे,पंचशिलनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सावंत कुटूंबिय मंगळवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.
…
भाजीबाजारात मोबाईल चोरी
नाशिक – भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या वृध्द ग्राहकाच्या खिशातील मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पेठरोडवरील सांगळे हॉस्पिटल समोरील भाजी मार्केट मध्ये घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कचरू गणपत काकड (७० रा.मखमलाबाद लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काकड गेल्या शनिवारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी पेठरोड भागात गेले होेते. सांगळे हॉस्पिटल समोर ते भाजीपाला खरेदी करीत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल हातोहात लांबविला. अधिक तपास पोलीस नाईक गवारे करीत आहेत.
……
शहरातून तीन मोटारसायकल लंपास
नाशिक – शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून, नुकत्याच वेगवेगळ््या भागात पार्क केलेल्या दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ, उपनगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हनुमान वाडीतील बाळासाहेब जगन्नाथ चौधरी (रा.चौधरी मळा) हे गेल्या गुरूवारी (दि.१६) दिंडोरीरोड भागात गेले होते. आरटीओ कॉर्नर येथील राजस्विट दुकानासमोर पार्क केलेली त्यांची शाईन एमएच १५ एफडब्ल्यू ०१०९ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार हळदे करीत आहेत.

दुसरी घटना चेहडीपंपीग भागात घडली. नितेश धोंडीबाजी बडोदे (रा. पारस अव्हेन्यु.जुना मालधक्का रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बडोदे यांची यामाहा एमएच १५ एक्स ५९४२ दुचाकी मंगळवारी (दि.२१) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.

तर सागर रमेश यशवंते (रा.सेंट्रल जेल समोर,भिमनगर) हे मंगळवारी (दि.२१) रात्री आगर टाकळी भागात गेले होते. वैदूवाडीत लावलेली त्यांची पल्सर एमएच १५ जीयू ८८२० चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चोराच्या उलट्या बोंबा! अंगावर डिझेल ओतून घेत पोलीसांना शिवीगाळ

Next Post

लस घेतल्यानंतर महिलांवर होतोय हा परिणाम

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
संग्रहित फोटो

लस घेतल्यानंतर महिलांवर होतोय हा परिणाम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011