नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जत्रा हॉटेल जवळ राहत्या इमारतीवरून उडी घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. सुनील शाहू भाग्यवान (४५ रा.नवचैतन्य सोसा.स्वामी समर्थनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भाग्यावान यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यवान यांनी रविवारी (दि.११) यांनी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या इमारतीसमोरील बिल्डींगवरून उडी घेतली होती. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने शेजारी नवनाथ शालक यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
पाईप लाईनरोडला एकाचा गळफास
औद्योगीक वसाहतीतील पाईपलाईन रोड भागात राहणा-या ५० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पराग जयंत टिवलकर (रा.सुगंधी शिला.पाईपलाईनरोड खांदवे नगर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
टिवलकर यांनी रविवारी (दि.११) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. मुलगी शिवानी पराग हिने त्यांना तातडीने श्री गुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत डॉ.अनिल घरटे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.