नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून कुठल्या ना कुठल्या नैराश्यातून नागरीक आत्महत्या करीत आहेत. सोमवारी (दि.१०) वेगवेगळ्या भागात राहणाºया पाच जणांनी आत्महत्या केली.त्यात चार जणांनी गळफास लावून घेत तर एकाने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. मृतांमध्ये चार जण सिडको परिसरातील रहिवासी असून सर्वाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपेंद्रनगर भागातील रामदास मुरलीधर रोकडे (५० रा.६ वी स्किम समोर) यांन सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत समाधान रोकडे यांनी खबर दिली आहे. दुसरी घटना कर्मयोगी नगर भागात घडली.
सागर रतन कुमार (२९ रा.रूग्ठा आॅरोझोन अपा.कर्मयोगीनगर) या युवकाने सोमवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत सुयोग ढेपे यांनी खबर दिली आहे. तिसरी घटना उंटवाडी भागात घडली.
रविंद्र मन्साराम पाटील (४८ रा.साईराम रो हाऊस,कालिका पार्क) यांनी सोमवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून भिंतीच्या हुकाला लहान बाळासाठी बांधलेल्या झोळीच्या दोरीने गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा कुणाल पाटील यांनी खबर दिली आहे.
कामटवाडा भागात राहणाऱ्या महेश मधुकर आडीवडेकर (२९ रा. साई समर्थ रो हाऊस,विठ्ठल नगर) या युवकाने सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून छताच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत आकाश घाडगे यांनी खबर दिली आहे. चारही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे,संगम,टिळेकर व हवालदार टोपले करीत आहेत.
विकास अशोक भट (४० रा.मिस्त्री पार्क आदित्य कुंज लोकशंकर नगर,पंचवटी टॉवर समोर) यांनी सोमवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस नाईक निलेश चव्हाण यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.
Nashik City Suicide 5 Persons Crime