नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – वेगवेगळ्या भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केली आहे. या तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले तरी त्यातील दोघांनी आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी नाशिकरोड, म्हसरूळ व इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना पांडवलेणी भागात समोर आली. शाम रामदास पालवी (३० रा.वाडीचरण गवळाणे रोड,पाथर्डी शिवार) यांनी अज्ञात कारणातून गुरूवारी पांडवलेणीच्या पाठीमागील बाजूच्या पायथ्याला अज्ञात कारणातून गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत प्रकाश मोरे यांनी खबर दिल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
दुस-या घटनेत सामनगाव रोडवरील लक्ष्मण उत्तम यादव (५५ रा.सिध्दार्थ नगर,एकलहरा) यांनी गुरूवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पत्र्याच्या अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. फिटच्या आजाराने त्रस्त असलेल्या यादव यांनी आजारपणास कटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून याबाबत राहूल पगारे यांनी खबर दिल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास, पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.
तिसरी घटना मखमलाबाद येथे घडली. आनंद राजेंद्र निरभवणे (३२ रा.सिध्दार्थनगर,म.बाद) यांनी लिव्हर आणि काविळच्या आजारास कंटाळून गुरूवारी आत्महत्या केली. राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून त्यांनी गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र निरभवणे यांनी खबर दिल्याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.