नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहराच्या काही भागात येत्या शनिवारी (५ मार्च) पाणी पुरवठा होणार नाही. तशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचा मुकणे धरण येथे पंपिंग जॅकवेल आहे. त्याला ३३ के.व्ही.चा वीजपुरवठा २२० के.व्ही.रेमण्ड सबस्टेशन येथून होतो. मात्र, हा वीज पुरवठा शनिवारी (५ मार्च) बंद राहणार आहे. कारण, या फिडरवरील दुरुस्ती कामी महावितरण कडून दुपारी १२.०० ते २.०० या कालावधीत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तरी बंद दरम्यान कालावधीत विल्होळी जल शुध्दीकरण केंद्रावरुन नाशिक शहरात संबंधित भागास होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. यास्तव शनिवारी नविन नाशिक मधील प्रभाग क्र.२४,२५,२६,२७,२९ व २२ भागश: व २८ व ३१ या संपुर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र.१४,१५,२३,३० भागश: या प्रभागामंध्ये (सकाळ व सायंकाळचा ) पाणी पुरवठा अंशत: विस्कळीत हाईल. तसेच रविवारी (६ मार्च) पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, अशी विनंती विभागाने केली आहे.