नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील एशियन इको लाईटींग प्रा.लि.या कारखान्यासमोर भरधाव दुचाकी घसरल्याने ४० वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. योगेश दत्तात्रेय कोठुळे (रा.सदगुरू निवास,महात्मा फुले गार्डन शिवाजीनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोठुळे बुधवारी (दि.२३) औद्योगीक वसाहतीतून आपल्या अॅक्सेस दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. एशियन इको लाईटींग प्रा.लि.या कंपनीसमोर भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. एमएच १५ एचएक्स ७११७ या चारचाकी वाहनचालकाने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याबाबत पोलिस शिपाई डी.व्ही.गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
झाडास अनोळखी तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दादोबा रोडवरील नंदिनी नदी किनारी ही घटना घडली. या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दादोबा रोडवरील नंदिनी नदी किनारी बुधवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास २१ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. अज्ञात कारणातून सदर युवकाने झाडास दोरी बांधून गळफास लावून घेतल्याचे आढळून आले आहे. १०८ अॅम्ब्युलन्स वरील डॉ. सोनाली मिश्रा यांनी त्यास मृत घोषित केले असून याबाबत यतिन निगळ यांनी खबर दिली. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten