नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीबीएस परिसरात भरधाव बसने धडक दिल्याने ५० वर्षीय महिला ठार झाल्याची घटना घडली. लता रामदास चव्हाण (रा.लेखानगर सिडको) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.चव्हाण या मंगळवारी सकाळच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी सीबीएस बसस्थानकात प्रवेश करीत असतांना हा अपघात झाला.
रस्ता ओलांडून त्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जात असतांना सीबीएस मध्ये भरधाव शिरणा-या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने बसचालक अशोक शिंदे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता अवघ्या काही तासातच उपचार सुरू असतांना डॉ. शुभी भटनागर यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत.
पाथर्डी फाटा परिसरात १९ वर्षीय युवतीची आत्महत्या
१९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पाथर्डी फाटा परिसरातील दामोधर नगर भागात ती राहत होती. माधुरी विलास गाडे (रा.साई दर्शन रो हाऊस,दामोधरनगर) असे मृत युवतीचे नाव आहे. माधुरीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माधुरी गाडे हिने मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल विलास गाडे यांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास इंदिरानगर पोलिस करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Road Accident Death