नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल भागात भरधाव दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका २४ वर्षीय तरूण चालकाचा मृत्यू झाला. हा अपघातात झाला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सनी राजेंद्र सुपेकर (२४ रा. कालिका मंदिरामागे, नाईकवाडीपुरा) असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. सुपेकर गेल्या शुक्रवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास त्र्यंबकरोडने एमएच १५ जीएस २३३६ या आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.
एबीबी सर्कल भागात सुपेकर यांच्या आणि भरधाव येणा-या डिओ मोपेड दुचाकीत समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात सुपेकर गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार रामदास खुळात यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.