नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील नववा मैल भागात कंटेनर आणि पेट्रोल टँकर यांच्यात झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला. भुपेश नागो मगर (२७ रा. झोडगे ता. मालेगाव) असे मृत पेट्रोल टँकर चालकाचे नाव आहे. भरधाव टँकर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळल्याने ही दुर्घटना घडली.
या अपघातात टँकरची चालक कॅबीन दबली गेल्याने मृत चालक अडकला गेला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मगर शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आपल्या पेट्रोल टँकरवर मालेगावकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. आडगाव शिवारातील ९ वा मैल भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर भरधाव टँकर पाठीमागून आदळला. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
या अपघातात टँकरची चालक कॅबीन पुर्णपणे दबली गेल्याने चालक मगर त्यात अडकले होते. नागरीकांनी धाव घेत त्यांना कॅबीन बाहेर काढून साई श्री हॉस्पिल येथे दाखल करण्यात आले होते. दुस-या दिवशी आडगाव मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ हलविले असता शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.