नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवर भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात मेघराज अरूणराव देशमुख (२९ रा.लखमापूर ता.दिंडोरी) हा दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी मालवाहू पिकअप चालकाविरूध्द म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण ज्ञानेश्वर ढोकणे (रा.तळेगाव ता.दिंडोरी) असे संशयित पिकअप चालकाचे नाव आहे.
देशमुख रविवारी रात्रीच्या सुमारास नाशिककडून दिंडोरीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. करी लिवज हॉटेल परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या मालवाहू पिकअपने दुचाकीस धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दुस-या दिवसी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस नाईक लिलके यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.
भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू
दिंडोरीरोडवर भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात झाला. रविंद्र संतू लोखंडे (रा.ओमकार प्लाझा,उपनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोखंडे सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास एमएच १५ जेजे ८७०६ या दुचाकीवर दिंडोरीरोडने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. म्हसरूळ गावाजवळ भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. पुतण्या ऋषीकेश लोखंडे यांने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Road Accident Death