नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील धुडगाव शिवारात दुचाकी अपघातात ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. हरी निवृत्ती खाडे (३२ रा. कश्यपनगर पो.धोंडेगाव नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खाडे शनिवारी (दि.२४) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. धुडगाव शिवारातील रामदास चव्हाण यांच्या शेतपरिसरात दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात खाडे गंभीर जखमी झाल्याने सागर खाडे यांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले.