नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील खालसा पंजाब ढाबा परिसरात दुचाकी अपघातात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ऋषीकेश विलास कातड (२३ रा. लेखानगर,जुने सिडको) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कातड गुरूवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास नाशिककडून ओझरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. खालसा पंजाब ढाब्यासमोर कातड यांची दुचाकी आणि एमएच १४ जेएल ९१८८ या वाहनांमध्ये धडक झाल्याने कातड हा तरूण गंभीर जखमी झाला होता. त्यास तातडीने लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ सासू शैला गांगुर्डे यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी दुपारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक बनकर करीत आहेत.
पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला
शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि सातपूर पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना सातपूर भागात घडली. मनेश बाळू डांगरे (रा.अंबिका स्विट मागे,महादेववाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. डांगरे यांची दुचाकी एमएच १५ सीएच २४७६ गेल्या २४ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मारूती मंदिर परिसरातील मसाला वन हॉटेल भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
दुस-या घटनेत नाशिकरोड येथील चेहडी पंपीग भागात राहणारे आनंद मोहनसिंग परगेशी (रा.राजसमर्थ सोसा.हनुमानचौक) हे गुरूवारी (दि.१) गोविंदनगर भागात गेले होते. अशोक वाईन्स समोर त्यांनी आपली अॅक्टीव्हा (एमएच १५ इडब्ल्यू ४९६०) पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.