नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील गडकरी चौक येथील सिग्नल ओलांडताना स्कॉर्पिओ कारचा अपघात झाला आहे. समोरुन अचानकपणे मिनी टेम्पो आला. त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकाला धडकून उलटली झाली. या कारने चार ते पाच कोलांटउड्या घेतल्या. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील ५ जण जखमी झाले आहेत.
या कारमध्ये मध्यप्रदेश येथील रावत कुटुंबीय होते. ते देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे आले होते. देवदर्शन आटोपून त्यांनी परतीचा प्रवास रात्री स्कॉर्पिओ कारमधून (एम.पी ४२ बीसी ०५७७) सुरू केला. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातामध्ये चैत्राव चुननी रावत (७०,रा.शिवपुरी, मध्यप्रदेश), त्यांची पत्नी मिलाबाई चैत्राम रावत (६५) त्यांचा पुतण्या रामप्रसाद रूपलाल रावत (५०), त्यांची पत्नी सुशीला रामप्रसाद रावत (५०) यांच्यासह जगन्नाथ मौजी पुंडे (६५) हे जखमी झाले आहेत.
या सर्व जखमींना स्थानिकांनी कारमधून बाहेर काढत रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik City Road Accident Car Devotees Injured