दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू
नाशिक – क्रॉम्प्टन कंपनीच्या गेट समोर सर्व्हीस रोडवरील गतीरोधकावर दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू झाला. गणेश यादव झडे (वय ३२, रिया प्राईड, वासननगर पाथर्डी फाटा) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाउ विकास तुकाराम झडे (वय २२, रतनवाडी मुतखेल, ता.अकोले जि.नगर) याच्या तक्रारीवरुन मृताचा मित्र
अभिजीत सुर्यकांत शेलार (श्रमिकनगर, सातपूर) याच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अभिजित शेलार आणि मृत गणेश झडे हे दोघे रविवारी (ता.१) आठच्या सुमारास दुचाकी (एमएच १५ एफसी २९०४) हिच्यावरुन विल्होळी हून नाशिकला येत होते. त्याचवेळी रात्री आठच्या
सुमारास सर्व्हीस रोडवर क्रॉम्प्टन कंपनीसमोरील गतीरोधकावर दुचाकी घसरून गणेश झडे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याचे निधन झाले. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलिस निरीक्षक बेडवाल तपास करीत आहे.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक – अंबड सातपूर लिंक रोड वरील महाराष्ट्र वजन काटा समोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. जगत नारायण सिंग (वय ३८, स्वामीनगर अंबड) असे अपघातात ठार झालेल्या मृताचे नाव आहे. काल बुधवारी (ता.४) दुपारी साडे तीनला हा अपघात घडला. याप्रकरणी मुन्ना झिल्लू रॉय (वय ४५, दत्तानगर, कारगील चौक, चुंचाळे शिवार) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास फिर्यादी मुन्ना हा मृत जगत नारायण सिंग याच्यासोबत दुचाकी (एमएच ५ एफझेड १४१७) हिच्यावरुन एक्स्लो पाईटकडून संजीवनगरकडे जात असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञात आयशर ट्रकने पाठीमागून दुचाकीच्या डिक्कीला धडक दिल्याने दोघे दुचाकीवरुन पडले त्यात, जगत नारायण सिंग हा जखमी होउन मरण पावला. ट्रकचालक अपघाताची कुठलीही माहीती न देता पळून गेला.