नाशिक – शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले. त्यातील एकावर नाशिकरोड येथे तर दुसºयावर आडगाव मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरू होते. याप्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
देवळाली गावातील दिलीप दामोदर गिलडा (५० रा.दत्त निवास,गाडेकर मळा) हे पाथर्डी गावाकडून वडनेरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. पाथर्डी गावातील दर्गा परिसरात समोरून भरधाव येणाºया टेम्पोने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गिलडा गंभीर जखमी झाले होते. सिग्नस रूग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना मुक्तीधान भागाताली एश्वर्ड केअर हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता गुरूवारी (दि.७) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.
दुसरा अपघात नाशिक पुणा रोडवरील शिंदेगावात झाला होता. दोन मोटारसायकलींच्या धडकेत विजय मनोहर नारखेडे (४८ रा.शिंदेगाव ता.जि.नाशिक) यांचा मृत्यु झाला. नारखेडे गेल्या रविवारी (दि.३) नाशिक पुणा मार्गाने आपल्या दुचाकीवर नाशिकरोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. तुळजा भवानी लॉन्स भागात विरूध्द दिशेने भरधाव येणाºया मोटारसायकलने नारखेडे यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. नाशिकरोड येथील साईकेअर हॉस्पिटल मधून त्यांना आडगाव मेडिकल कॉलेज मध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.