नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील धामणकर कॉर्नर भागात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोन तरूण जागीच ठार झाले. अर्णव मंगेश पाटील (२३ रा.निखील पार्क अंबड लिंकरोड,कामटवाडे) व करण संजय जायभावे (२२ रा.शिवाजीनगर, सातपूर) अशी मृत युवकांची नावे आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील व जायभावे हे दोघे मित्र बुधवारी मध्यरात्री एमएच १५ जीएस ८०६५ या दुचाकीवरून सातपूर कडून ठक्कर बाजार बसस्थानकच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. वेद मंदिर परिसरात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघे जागीच ठार झाले. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीचा चक्काचुर झाला.
चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून सरकारवाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने दोघांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय सुत्रांनी दोघांना मृत घोषीत केले. याप्रकरणी हवालदार बागुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून मृत चालक अर्णव पाटील याच्याविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उफनिरीक्षक पाटील करीत आहेत.