नाशिक – राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी कोरोनाच्या नव्या अवताराने सध्या चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. याची दखल महापालिका आयुक्तांनीही घेतली आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात आज एक बैठक घेऊन महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
नाशिक शहरात शाळांचे सध्या आठवीपासून पुढचे वर्ग सुरू आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात असल्याने आता पहिलीपासून शाळा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्ती केली जात आहे. राज्य सरकारने शहरातही पहिलीपासून वर्ग सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यातच आता नव्या विषाणूने दस्तक दिली आहे. परिणामी, यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे.
त्यामुळे नाशिक शहरातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार नाहीत. याबाबत येत्या १० डिसेंबर रोजी पुन्हा आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यात पुढील निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजेच, येत्या १० डिसेंबरपर्यंत नाशिक शहरातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माध्यमिक विभागाचे वर्ग मात्र सुरूच राहणार आहेत. शाळा, विद्यार्थी व पालकांनी मात्र योग्य ती खबरदरी घ्यावी. नवा कोरोना विषाणू हा अतिशय संसर्गजन्य व धोकादायक असल्याने सर्वांनी कोरोनानिर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.
नाशिक मनपा शिक्षण विभागाने काढलेले आदेश असे