नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात असून, अवैध धंद्यासह गुन्हेगारांची बिमोड करण्यासाठी थेट व्हॉटसअप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर येणाºया संदेशाची नियंत्रण कक्षातून तात्काळ दखल घेतली जाणार असून नागरीकांनी निर्भयपणे थेट या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात नागरीकांच्या निदर्शनास येणाºया घटना घडामोडींची पोलिसांना तात्काळ माहिती व्हावी या हेतूने ८२६३९९८०६२ हा व्हॉटसअप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून निर्भयपणे अवैधधंदे,गुन्हेगारी तसेच वाहतूक कोंडीसह अपघातातबाबत पोलिसांना माहिती देता येईल. या माहितीच्या आधारे पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पोहचणे शक्य होणार आहे. नियंत्रण कक्षातून याची दखल घेतली जाणार असून, या क्रमांक फक्त संदेश आणि फोटो – व्हिडीओसाठी उपलबध्द असून नागरीकांनी कॉल न करता त्यावर माहिती पाठवावी असे आवाहन आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Commissionarate CP Social Media