नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातून अल्पवयीन मुलांचे अपहरण होत असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे पालकांसह शाळांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अखेर यासंदर्भात नाशिक पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मिडियात एक मेसेजज प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील पाच मुलींसह एका मुलाचे अपहरण झाले आहे. मात्र, तशी कुठलीही तक्रार अद्याप आलेली नाही. काही बनावट फोटो आणि मेसेज चुकीच्या पद्धतीने पाठविले जात आहेत. अशा प्रकारच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नये. आपल्या कुटुंबातील अल्पवयीन मुला-मुलींना कुठेही एकटे सोडू नये. तसेच, योग्य ती काळजी घ्यावी. शंका असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर, खोटे मेसेज आणि अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही नाशिक पोलिसांनी दिला आहे.
Nashik City Police on Minor Children’s Kidnapping Viral Message
Crime Social Viral
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD