नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रेडिट कार्डवर पर्सनल लोन मंजूर करून सव्वा चार लाख रूपये परस्पर लांबविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी बँक खातेदाराची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुकेश रमेशचंद्र सोनवणे (रा.गोविंदनगर नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. गेल्या शनिवारी (दि.५) भामट्यांनी सोनवणे यांच्याशी संपर्क साधला होता. ९९५३८७५८८० या मोबाईलधारकाने दिलीप रंजन नाव असल्याचे सांगून आपण अॅक्सिस बॅकेतून बोलत असल्याचे सांगितले. संबधित भामट्याने अॅक्सिस बँकेतील बचत खात्याला जोडलेले पॅनकार्ड अपडेट नसल्याचे सांगून ही फसवणूक केली. सोनवणे यांचे अॅक्सीस बँकेत बचत खाते असल्याने त्यांनी काय करावे लागेल अशी विचारणा केली असता संबधिताने तात्काळ अपडेटसाठी मोबाईल मध्ये अॅक्सिस डॉट एपीके अॅप्लीकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले.
सोनवणे यांनी अॅप्लीकेशन इन्स्टॉल करताच भामट्याने सोनवणे यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. त्यावर ४ लाख १८ हजार रूपयांचे तात्काळ पर्सनल लोन मंजूर करून घेतले. त्यातील ४ लाख १५ हजार ९८५ रूपयांची रक्कम सोनवणे यांच्या बचत खात्याच्या माध्यमातून अन्य खात्यांवर परस्पर वर्ग करून ही आर्थिक फसवणुक केली. याबाबतचा संदेश प्राप्त होताच सोनवणे यांनी बॅकेत जावून पडताळणी अंती पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Pan Card Update Cyber Crime Cheating