नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेच्या सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासून सातपूर, अशोक नगर आणि नाशिक पश्चिम भागात पाणीपुरवठा होतो. या परिसरातील जलकुंभ भरणारी 1200 मी.मी. व्यासाची पी.एस.सी सिमेंटची गुरुत्व वाहिनीला महिंद्रा कंपनी MQS Gate कंपाऊंड लगत प्रभावती हॉस्पिटल समोर गळती सुरु झाली आहे. सदर दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. यास्तव मंगळवार दि. 27/09/2022 रोजी सदरील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सातपुर जूना प्रभाग क्रमांक 8, 10 व प्रभाग क्रमांक 11 भागश: मधील प्रबुद्ध नगर परिसर, तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 7 (भागश:) मंगळवार दि. 27/09/2022 रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच, बुधवार दि. 28/09/2022 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
या भागात पाणी पुरवठा होणार बाधित
1) सातपूर विभागातील* जुना प्रभाग प्र.क्र. 8, व 10 चा संपूर्ण परिसर व प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्ध नगर परिसर
2) *नाशिक पश्चिम विभागातील* *प्रभाग क्रमांक.7(भागश:)* मधील गंगापूर रोडवरील माणिक नगर ,श्रमिक कॉलनी , गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन परिसर, विनय कॉलनी ,सहदेव नगर सुयोजित गार्डन ,दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन सोसायटी, चैतन्य नगर ,आयाचित नगर निर्मला कॉन्व्हेंट शाळा इत्यादी सर्व परिसर
वरील प्रमाणे नमूद परिसरात दिनांक 27/09/2022 मंगळवार रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहील.