नाशिक – नाशिक शहराच्या काही भागात येत्या सोमवारी आणि मंगळवारी पाणी पुरवठा खंडित राहणार आहे. तशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. विभागाने म्हटले आहे की, भवानी माता येथील जलकुंभ येथे रायझिंग मेन क्रॉस कनेक्शन करावयाचे आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३० मधील श्रध्दा विहार, श्रध्दा गार्डन, कलानगर, पांडवनगरी, शर्वरी नगरी, आण्णाभाऊ साठे नगर, मुमताज नगर, वडाळा गावातील उर्वरित भाग तसेच प्रभाग क्रमांक ३१ मधील म्हाडा कॉलनी, ज्ञानेश्वर नगर इत्यादी भागाचा पाणी पुरवठा बाधित होणार आहे. येत्या सोमवारी (२३ जून) सकाळ व दुपार सत्रातील पाणी पुरवठा या भागात होणार नाही. तर, मंगळवारी (२४ ऑगस्ट) रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे महापालिकेने कळविले आहे.