नाशिक – महापालिकेच्या सहाही प्रभागातील सभापती पदाची निवडणूक आज संपन्न झाली. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, स्थायी समिती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहाही प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली.
यामध्ये पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप, पूर्व प्रभाग समिती सभापतीपदी डॉ. दिपाली कुलकर्णी, नाशिक पश्चिम प्रभाग समिती सभापतीपदी वत्सला खैरे, नवीन नाशिक प्रभाग सभापतीपदी सुवर्णा मटाले, सातपूर प्रभाग समिती सभापतीपदी योगेश शेवरे व नाशिकरोड प्रभाग समिती सभापती पदी प्रशांत दिवे यांची निवड केल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केली.
यावेळी नगरसचिव राजू कुटे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. यानंतर या सर्व सभापतींचा सत्कार पीठासन अधिकारी यांनी केला. तसेच मनपा पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार केला.
पंचवटी आणि पश्चिम प्रभाग सभापती हे बिनविरोध निवडले गेले आहेत. पंचवटी प्रभागाच्या सभापतीपदी नगरसेवक मच्छिंद्र सानप यांची निवड झाली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे ते चिरंजीव आहेत. नगरसेविका रुची कुंभारकर आणि पूनम सोनवणे यांनी माघार घेतल्याने सानप यांची बिनविरोध निवड झाली. तर, पश्मिचमध्ये आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे यांना माघार घ्यावी लागली आहे. कारण, भाजपचे संख्याबळ होत नसल्याने आणि नगरसेविका वैशाली भोसले यांचे असहकार्य यामुळे हिरे यांना माघार घ्यावी लागली. अखेर काँग्रेसच्या वत्सला खैरे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे खैरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सहाही विभागातील निवडीचे छायाचित्र असे