मंगळवार, नोव्हेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशकात अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात मनपाची जोरदार कारवाई; इतक्या लाखांचा दंड वसूल

फेब्रुवारी 13, 2023 | 7:34 pm
in स्थानिक बातम्या
0
20230213 190907 e1676296096146

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अस्वच्छता करणारे नागरिक आणि आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात म्हणजेच १ ऑगस्ट २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ दरम्यान एकूण ५०७ केसेसची नोंद झाली आहे. त्यातून ७,५०,४०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित नाशिक, स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ हे ध्येय समोर ठेऊन महानगरपालिकेची कार्यवाही सुरु आहे. शहरात स्वच्छता राखण्यासासाठी भाजी मार्केट, बाजारपेठ, शहरातील विविध चौक, फुटपाथ, गर्दीची ठिकाणे येथे मनपाची पथके लक्ष ठेऊन आहेत. अस्वच्छता करणा-यांकडून दंड वसुल केला जात आहे.

कोणत्या कारणांमुळे कारवाई?
विलगीकरण न केलेला आणि वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा सोपवल्याबद्दल (घरगुती आणि व्यावसायीक आस्थापना), एसडब्लूएम अधिनियमन 2016 चा भंग केल्याबाबत, नदी, नाले येथे अस्वच्छता करणारे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, रस्ते मार्गावर अस्वच्छता करणे, पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यावर घाण होणे, पालापाचोळा, प्लास्टिक, रबर आणि सर्व प्रकारचा कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मैला टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, उघड्यावर लघुशंका करणे, जैविक कचरा (बायो मेडीकल वेस्ट) सार्वजनिक ठिकाणी टाकणे अशा कारणांमुळे मनपाकडून दंडात्मक कारवाई होत आहे.

रस्ता अस्वच्छतेच्या जास्त केसेस
मनपाकडून गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक कारवाई रस्ते मार्गावर अस्वच्छता करणा-यांविरुद्ध झाली आहे. अशा एकूण १९७ केसेस असून ५७ हजार २६० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्याखालोखाल सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी एकूण ११२ केसेस आहेत. त्यातून ३ लाख ९७ हजार ३६० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. नागरिकांनी, विक्रेत्यांनी आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे. खराब भाजीपाला, कचरा रस्त्यावर टाकू नये, कच-याचे वर्गीकरण करावे अन्यथा मनपाकडून संबंधित नागरिक किंवा आस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं आवाहन महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.

Nashik City NMC Corporation Fine Cleanliness

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

WPL महिला क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव… हिच्यावर सर्वाधिक बोली… बघा, खेळाडूंच्या संपूर्ण लिलावाची यादी

Next Post

हरियाणाचा दारा रेडा… २.८ फूट उंचीची कुंगनुर गाय… नगरच्या कृषी महोत्सवाचे आकर्षण… उद्या शेवटचा दिवस

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
crime1 1
महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणावर थेट तलवारीने सपासप वार… नाशकातील घटना…

नोव्हेंबर 10, 2025
Audi Q3 Signature Line
महत्त्वाच्या बातम्या

भारतात लॉन्च झाल्या ऑडीच्या या लक्झुरीअस कार…

नोव्हेंबर 10, 2025
thandi
मुख्य बातमी

थंडीच्या लाटेबाबत असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 10, 2025
bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
Next Post
IMG 20230213 WA0031 e1676298732887

हरियाणाचा दारा रेडा... २.८ फूट उंचीची कुंगनुर गाय... नगरच्या कृषी महोत्सवाचे आकर्षण... उद्या शेवटचा दिवस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011