नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक २४ मधील बडदेनगर येथील पाच फुटांहून अधिक खोल असलेले, कोसळलेले चेंबर पुन्हा बांधण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले असून, महापालिकेचे आभार मानण्यात आले आहे.
गॅसवाहिनी आणि इतर कामे, तसेच अवजड वाहनांमुळे अनेक ठिकाणी पावसाळी आणि ड्रेनेजचे चेंबर तुटलेले आहेत, रस्त्याच्या खाली दबलेले आहेत, यामुळे दुर्घटना होण्याची भीती आहे. हे चेंबर पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. २५ मे रोजी महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे. यानंतर बांधकाम विभागाने कालिका पार्क, गोविंदनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर भागात चेंबरची दुरुस्ती केली. जुने सिडको, शिवाजी चौक, महाराणाप्रताप चौक येथून बडदेनगरकडे जाणार्या वळणावर मोठे पावसाळी चेंबर पूर्णपणे तुटले होते. त्याचे बांधकाम पडल्याने ते खचले होते. ते धोकादायक झाल्याने दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली होती. बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी ही स्थिती महापालिका बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली, सतत आठ दिवस पाठपुरावा केला. रविवारी, १८ जूनला सकाळपासून या चेंबरच्या कामाला सुरुवात झाली. दगडमाती काढून त्याचे पुन्हा बांधकाम करण्यात आले. पाच फुटांहून अधिक खोल असलेले हे चेंबर पूर्ण दुरूस्त झाल्याने पावसाळी पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, नीलेश ठाकूर, विठ्ठल देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, विनोद पोळ, मनोज वाणी, सतीश मणिआर, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे आदींनी महापालिकेचे आभार मानले आहेत.