नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या इशार्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सिटी सेंटर मॉल सिग्नलवरील फुटलेल्या चेंबरची सोमवारी दुरुस्ती करण्यात आली, त्यावर मजबूत ढापा टाकण्यात आला. यामुळे अपघाताचा मोठा धोका टळला आहे.
नाशिकच्या सिटी सेंटर मॉल सिग्नलवर पावसाळी गटारीचे चेंबर फुटले होते, त्याची फ्रेमही तुटली होती. दोनवेळा ड्रेनेजचे तकलादू चेंबर टाकण्यात आले; परंतु ते पुन्हा तुटले. गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल सिग्नल ओलांडून मॉलकडे दररोज हजारो वाहने जातात. रात्री गर्दी कमी असल्याने, सिग्नल बंद असल्याने वाहने वेगात जातात. अनेकदा स्ट्रीट लाईट बंद असल्याने अंधारही असतो. फुटलेल्या चेंबरमुळे मोठा अपघात होण्याची भीती होती. या ठिकाणासह प्रभाग २४ मधील चेंबरची दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने रहिवाशांच्या वतीने देण्यात आला होता. याबाबतचे निवेदन महापालिकेला दि. २५ मे २०२३ रोजी देण्यात आले आहे.
महापालिकेने सोमवारी, २९ मे रोजी सिग्नलवरील या चेंबरचे बांधकाम केले, नवी फ्रेम टाकली, त्यावर चार इंची पावसाळी गटारीचा मजबूत ढापा टाकला. यामुळे येथील अपघाताचा मोठा धोका टळला आहे. याबद्दल बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, भारती देशमुख, वंदना पाटील, प्रकाश दुसाने, बाळासाहेब तिडके, डॉ. शशीकांत मोरे, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, विनोद पोळ, डॉ. राजाराम चोपडे, मनोज वाणी, अशोक पाटील, नीलेश ठाकूर, बापूराव पाटील, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, दिलीप दिवाणे, मनोज पाटील, अशोक देवरे, दिलीप निकम, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, दीपक दुट्टे, प्रथमेश पाटील, हरिष काळे, संकेत गायकवाड (देशमुख), राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.
इतर चेंबर दुरुस्ती केव्हा
प्रभाग क्रमांक २४ मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील ड्रेनेज व पावसाळी चेंबर रस्त्यांच्या खाली दबले आहेत, काही वर आले आहेत, नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती केव्हा होणार, याची प्रतिक्षा आहे.