नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक २४ मध्ये गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम रविवारपासून सुरू झाले आहे. खडीकरण सुरू झाले असून, त्यानंतर डांबरीकरणही करण्यात येणार आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले असून, महापालिकेचे आभार मानण्यात आले आहे.
गोविंदनगर, कर्मयोगीनगर, बडदेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, कालिका पार्क, उंटवाडी, तिडकेनगर आदी भागात गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी खडीकरण, डांबरीकरण करावे, प्रभागातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावे, अशी मागणी करीत सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली १६ मार्च रोजी तिडकेनगर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. २० मार्च रोजी महापालिकेला निवेदन देण्यात आले होते.
त्यानंतर गायकवाड (देशमुख) यांनी महापालिका बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला. रविवार, दि. २१ मे पासून जगतापनगर, उंटवाडीतून रस्ते खडीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण प्रभागात खोदलेल्या सर्व रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात येईल, अशी माहिती उपअभियंता हेमंत पठे, शाखा अभियंता जगदिश रत्नपारखी यांनी दिली. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केल्याबद्दल बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, विनोद पोळ, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, शैलेश महाजन, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, बाळासाहेब देशमुख, वंदना पाटील, भारती देशमुख, शशीकांत मोरे, टी. टी. सोनवणे, डॉ. राजाराम चोपडे, बापूराव पाटील, बाळासाहेब राऊतराय, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, मनोज वाणी, मगन तलवार, दिलीप दिवाणे, श्रीकांत नाईक, पुरुषोत्तम शिरोडे आदींनी महापालिकेचे आभार मानले आहे.