नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदिनी नदीपात्रात ठिकठिकाणी डबके तयार झाल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. डासांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीपात्रातील चरांतील अडथळे दूर करून पाणी प्रवाहीत करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका शहर अभियंत्यांना याबाबत सोमवारी, १५ मे रोजी निवेदन देण्यात आले आहे.
नंदिनी नदीपात्रातील चरांमध्ये माती, दगड, वीटा आणि इतर घाण यांचे ढिग साचले आहेत. यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. ही ठिकाणे डासांची उत्पत्तीस्थाने झाली आहेत. साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. गोविंदनगर, तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, मंगलमूर्तीनगर, जुने सिडको, बडदेनगर, उंटवाडी यासह संपूर्ण प्रभाग क्रमांक २४ मध्ये डासांचा उच्छाद वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदीसह या प्रभागातील इतर नाल्यांमधील जेसीबीद्वारे पाणी प्रवाहीत करावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, विनोद पोळ, बापूराव पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र कानडे, अशोक पाटील, वंदना पाटील, मीना टकले, भारती देशमुख, मगन तलवार, तेजस अमृतकर, मनोज वाणी, निलेश ठाकूर, दीपक दुट्टे, पुरुषोत्तम शिरोडे, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी केली आहे.