सोमवार, फेब्रुवारी 2, 2026
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जॉगिंग ट्रॅक, गॅबीयन वॉल, बॉक्स कल्व्हर्ट, पुलांवर संरक्षक जाळ्यांच्या कामांना मंजुरी; ४ कोटी ७० लाख ६० हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध

एप्रिल 25, 2023 | 3:45 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230425 WA0151 e1682417650644

 

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे मोठे यश
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोविंदनगर येथील जॉगींग ट्रॅकचे नूतनीकरण, उंटवाडीत नंदिनी नदीच्या कडेला गॅबीयन वॉल, कोठावळे मळ्यात बॉक्स कल्व्हर्ट, तसेच मुंबई नाका येथील पूल व मंगलमूर्ती नगर येथील शिवालय कॉलनीतील नाल्यावर संरक्षक जाळी या प्रभाग २४ मधील कामांना महापालिकेची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामांच्या एकूण ४ कोटी ७० लाख ६० हजार ६२८ रुपयांच्या निविदा निघाल्या असून, बुधवार २६ एप्रिल २०२३ रोजी त्या संकेतस्थळावर दिसणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, महापालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने वरील कामांसाठी प्रयत्न करण्यात आले. दोंदे पुलाजवळ नंदिनी नदीकिनारी संरक्षक भिंत (गॅबीयन वॉल) बांधावी, यासाठी दि. ३१ मे व १६ नोव्हेंबर २०२१ ला निवेदने देण्यात आली. अधिकार्‍यांच्या पाहणीनंतर ८ डिसेंबर २०२१ ला यासाठी १ कोटी ६४ लाख ८९ हजार १४४ रुपयांचे प्राकलन करण्यात आले. त्यासाठी पैसे नसल्याने अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी १४ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली. तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ८ फेब्रुवारी २०२२ च्या अर्थसंकल्पात १ कोटी ६४ लाख ९० हजार रुपयांची तरतूद केली. त्यानुसार पुन्हा प्रस्ताव करण्याची मागणी १८ एप्रिल २०२२ ला करण्यात आली. बदललेली दर सूची व जीएसटीसह २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात वाढीव रक्कमेसह एकूण दोन कोटींची तरतूद धरण्यात आली आहे. तब्बल तेवीस महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर या कामासाठी १ कोटी ९७ लाख ४९ हजार २२५ रुपयांची ई-निविदा निघाली.

गोविंदनगर येथील स्वर्गीय शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅकला संरक्षक भिंत बांधावी, नूतनीकरण करावे, यासाठी दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी निवेदन दिले. यासाठी आर्थिक तरतुदीची मागणी १४ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली. ८ फेब्रुवारी २०२२ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ७५ लाख रुपयांची तरतूद केली. १८ एप्रिल व २५ एप्रिल २०२२ रोजी या कामाचा प्रस्ताव करण्याचे निवेदन दिले. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी ७४ लाख ८३ हजार ४६१ रुपयांचा प्रस्ताव तयार झाला. दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ही ई-निविदा निघाली.

बडदेनगर, पाटीलनगर १८ मीटर रस्त्यालगत कोठावळे मळ्यात सर्व्हे नं. ९६७/९६६ जवळच्या नाल्यावर बॉक्स कल्व्हर्टसाठी दोन कोटींची तरतूद प्रशासनाने केली होती. मात्र, त्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत नव्हता. यासाठी ९ जून २०२२ रोजी यासंदर्भात आयुक्तांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता (सपना थिएटरजवळील १८.०० मीटर रोडलगत संरक्षक भिंत व बॉक्स बांधणे) या कामाची १ कोटी ९० लाख ४५ हजार ८०६ रुपयांची निविदा काढण्यात आली. मुंबई नाका येथे डेटामॅटिक्सजवळील पुलावर दोन्ही बाजूला, तसेच मंगलमूर्तीनगर येथे खांडे मळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील नाल्यावर संरक्षक जाळी बसविण्याची मागणी करण्यात आली, वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. या कामांसाठी ७ लाख ८२ हजार १३६ रुपयांची निविदा मंजूर झाली.

या सर्व कामांसाठी आर्थिक तरतूद धरण्यापासून प्रस्ताव तयार करणे, त्रुटी दूर करून तो मंजूर करण्यासाठी बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी वेळोवेळी महापालिका आयुक्तांसह सर्व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. त्रुटी दूर करण्यासाठी व प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी, ई-निविदा काढण्यापर्यंत पाठपुरावा केला. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, रवींद्र सोनजे, मनोज वाणी, सतिश मणिआर, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, डॉ. शशीकांत मोरे, अनंत संगमनेरकर, बन्सीलाल पाटील, अशोक पाटील, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, बापूराव पाटील, बाळासाहेब तिडके, फकिरराव तिडके आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.
IMG 20230425 WA0155 1

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जेलरोडच्या सराफी दुकानात भरदिवसा चोरी… काऊंटरवरुन दागिने चोरीला… घटना सीसीटीव्हीत कैद

Next Post

ओळखीच्याच तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार.. मुलगी गर्भवती… अखेर गुन्हा दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

ओळखीच्याच तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार.. मुलगी गर्भवती... अखेर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011