..
नाशिक: कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात तसेच नाशिक जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. १२ मे पासून वाढत्या रुग्ण संख्येला विचारात घेऊन जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले होते. गेल्या वर्षांपासून आधीच बिकट असलेली असंघटित कामगारांची परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे दिसून येत आहे, अशा परिस्थितीत आर्थिक दृष्टीने मागास असंघटित कामगारांना सरकारी रेशन व्यवस्थेतुन मिळणाऱ्या मदतीला अधिक हातभार लागावा व लॉकडाऊनमध्ये किमान उपासमारीची वेळ येऊ नये हे उद्दिष्ट समोर ठेऊन ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (AISF) नाशिकच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांमार्फत ११ मे २०२१ पासून अत्यावश्यक किराणा मालाची जेलरोड, सिन्नर फाटा, श्रमिकनगर, प्रबुद्धनगर, सातपूर राजवाडा, जगतापवाडी, कांबळेवाडी, लेखा नगर, त्रिमूर्ती चौक, गंगापूर गाव आदी परिसरातील १०१६ घरकामगार मोलकरणींना थेट मदत पोहोचविण्यात आली.
सदर मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेच्या मीना आढाव तसेच आयटक कामगार संघटनेचे राज्यसचिव कॉम्रेड राजू देसले, रोटी बँक उपक्रमाचे संचालक संदीप फाउंडेशनचे प्राचार्य प्रशांत पाटील, लायन्स क्लब नाशिकचे विजय बाविस्कर, एस्पँलीअर शाळेचे संस्थापक सचिन जोशी, मधुकर दुबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी AISF चे राज्याध्यक्ष विराज देवांग, जिल्हाध्यक्ष अविनाश दोंदे, जयंत विजयपुष्प, अपूर्व इंगळे, गायत्री मोगल, अजिंक्य रहाळकर, तल्हा शेख, निकिता झाल्टे, ओवी करवा, कैवल्य चंद्रात्रे आदींनी वस्त्या वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष मदत पोहोचविण्यात सहभाग नोंदविला.