नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तणावमुक्त, आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी सत्कार्य फाउंडेशनने कर्मयोगीनगर येथे सत्कार्य महिला हास्य योग क्लबची स्थापना केली आहे. औदुंबर वाटिका उद्यानात एक जानेवारीपासून हास्य योगासह विविध व्यायाम प्रकार केले जात आहेत. परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने आणि या परिसरात ही चळवळ रुजविणार्या छाया नवले यांच्या मार्गदर्शनाखाली एक जानेवारी २०२३ पासून महिलांचा हास्य योग क्लब सुरू करण्यात आला. तणावमुक्त, आनंदी आणि निरोगी जीवनासाठी हास्य आणि तेही समूह हास्य किती महत्त्वाचे आहे, हे छाया नवले यांनी विषद केले. स्वत: हसा, दुसर्याला हसवा आणि नेहमी प्रसन्न राहण्याचा मंत्र जोपासा, असे चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी सांगितले. कर्मयोगीनगर येथील औदुंबर वाटिका उद्यानात दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत प्रथम हातापायाचे हलकेफुलके असे पूरक व्यायाम घेतले जातात. टाळी, स्वागत, अभिनंदन करणे यासह हास्याचे विविध प्रकार शिकविले जातात. हास्य योगासह दीर्घ श्वासाचे प्रकार शिकविले जातात. पुरुषांनीही हास्य योगाचे धडे घ्यावेत. कालिका पार्क, उंटवाडी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जगतापनगर परिसरातील रहिवाशांनी या क्लबमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, छाया नवले, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, डॉ. शशिकांत मोरे, पुरुषोत्तम शिरोडे, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, विनोद पोळ, शैलेश महाजन, अशोक पाटील, भारती देशमुख, रंजना सुर्वे, ज्योत्स्ना पाटील, मीना टकले, संगिता देशमुख, धवल खैरनार, प्रतिभा पाटील, वंदना पाटील, अलका दिंडे, विजया पाटील, विमल हिरे, उज्ज्वला सोनजे, लता आलूवालीया, छाया पोतद्दार, शीतल गवळी, दिलीप दिवाणे, संजय टकले, बाळासाहेब राऊतराय, अशोक गाढवे, दीपक दुट्टे, राहुल काळे आदींनी केले आहे.