नाशिक- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या आंदोलनानंतर दुसर्याच दिवशी गुरुवारी कर्मयोगीनगर येथील जॉगिंग ट्रॅकच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्वरित दखल घेवून महापालिकेने संबंधित कंपनीकडून काम सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त होत आहेत. पंधरा महिन्यांपासून हे काम रखडले होते. प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर, कर्मयोगीनगरच्या जॉगिंग ट्रॅकचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. गतिरोधक बसवावेत. रस्ते, उद्यानांची दुर्दशा थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी नागरीक रस्त्यावर उतरले. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली आर डी सर्कल येथे निदर्शने करण्यात आली, समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याची महापालिकेने त्वरित दखल घेतली, आर. डी. मायनिंग इक्वीपमेंट कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या कामाचे भूमिपूजन गुरुवारी, दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीचे संचालक राहुल देशमुख, शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, रवींद्र सोनजे, आर. आर. जाधव, दिलीप निकम, अशोक गाढवे, विनोद पोळ, माधव माळी, कृष्णाजी विसाळे, रमेश गावीत, राजमाता जिजाऊ हास्य क्लबच्या सदस्या छाया नवले, भारती देशमुख, रंजना सुर्वे, कांचन महाजन, सुरेखा बोंडे, वंदना पाटील, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) आदी उपस्थित होते. यावेळी मायनिंग इक्वीपमेंट कंपनीचे संचालक राहुल देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
पंधरा महिन्यांपासून काम रखडले होते
कर्मयोगीनगर येथे जॉगिंग ट्रॅक विकसित करणे, मोकळ्या जागेत सुशोभिकरण करण्याचे काम महापालिकेने आर. डी. मायनिंग कंपनीला सीएसआर फंडातून करण्यासाठी दिले आहे. याबाबत स्थायी समिती विषय व ठराव क्रमांक ४१४ हा ९ सप्टेंबर २०२१ रोजीच मंजूर करण्यात आला आहे. तेव्हाच सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. पंधरा महिने उलटूनही काम सुरू होत नव्हते. अखेर बुधवारी झालेल्या आंदोलनानंतर गुरुवारी भूमिपूजन होवून काम सुरू झाले.