शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा
नाशिक – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने प्रभाग क्रमांक २४ मधील उद्यानांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानातून पाच ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला आहे. यानंतर राजमाता जिजाऊ महिला हास्य क्लबच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्रभाग क्रमांक २४ मधील उद्यानांमध्ये कचर्याचे ढिग साचले आहेत. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या उद्यानांचा वापर करणे अडचणीचे ठरत आहे. उद्यानांची स्वच्छता मोहीम राबवावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने उद्यान उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी देण्यात आले होते. यानंतर गोविंदनगरच्या विघ्नहर्ता उद्यानातील तीन ट्रॅक्टर कचरा काही दिवसांपूर्वी उचलण्यात आला, काल रविवारी, दि. ११ डिसेंबर रोजी आणखी दोन ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला. आता येथे महापालिकेकडून साफसफाई करण्यात येत आहे. घनकचरा विभागाकडून ट्रॅक्टर उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व उद्यानांची साफसफाई करण्यात येईल, असे उपायुक्त मुंडे यांनी सांगितले आहे.
विघ्नहर्ता उद्यानात कचरा उचलून साफसफाई केल्याबद्दल राजमाता जिजाऊ हास्य क्लबच्या महिलांनी या उद्यानात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, के. के. सहाणे, सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, हास्य क्लबच्या संयोजिका डॉ. सुषमा दुगड, सहसंस्थापिका छाया नवले, भारती देशमुख, विद्या देशमुख, रंजना सुर्वे, यशोदा अमृतकर, लता साळवे, शालिनी कुलकर्णी आदी हजर होत्या. शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, बापूराव पाटील, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, डॉ. शशीकांत मोरे, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, सुनीता उबाळे, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी उद्यानांची स्वच्छता मोहीम सुरू केल्याबद्दल महापालिकेचे आभार मानले आहेत.