नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडको – अंबड लिंक रोड वरील देवदत्त नगर कडे जाणा-या वळण रस्त्यावर चेंबर झाकण तुटले आहे. त्यामुळे या रस्त्यावर या ठिकाणी अपघात होत आहे. या चेंबरबाबत स्थानिकांनी तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या चेंबरची तातडीने दुरुस्त करुन अपघात होणार नाही याची काळजी महानगरपालिकेने घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये अपघाताचे सत्र सुरु आहे. त्यात रस्त्यातील या छोट छोट्या गोष्टीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करु नये असे स्थानिकांनी सांगितले.