नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्मयोगीनगर, गोविंदनगर येथील आर डी सर्कल आणि नयनतारा इमारतीजवळील नियोजित जॉगिंग ट्रॅकची साफसफाई करून सपाटीकरण करण्यात आले. सकाळ-सायंकाळ जॉगिंगसाठी या जागेचा वापर नागरिकांनी सुरू केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि सत्कार्य फाउंडेशनने महापालिकेचे आभार मानले आहेत.
कर्मयोगीनगर कॉर्नरवर आर डी सर्कलजवळ, तसेच इंडिगो पार्कजवळील जॉगिंग ट्रॅकच्या नियोजित जागेत कचर्याचे, मातीचे ढिग साचले होते. मोठ्या प्रमाणात गाजरगवतही वाढले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने नागरिकांनी केलेल्या मागणीची महापालिकेने दखल घेतली. जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करून सपाटीकरण केले. आता या नियोजित ट्रॅकचा वापर सकाळ-सायंकाळ जॉगिंगसाठी केला जात आहे.
चारूशीला गायकवाड (देशमुख), बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, श्रीकांत नाईक, मनोज पाटील, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, सुनीता उबाळे, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील यांच्यासह नागरिकांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.