नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –आगरटाकळी रोड भागात घराजवळील पाण्याच्या डबक्यात पडल्याने २ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आदी रमेश चव्हाण (रा.पंककृष्ण बंगला,काठे मळा) असे मृत बालकाचे नाव आहे. आदी चव्हाण हा बालक सोमवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास आपल्या अंगणात खेळत असतांना ही घटना घडली. घराशेजारी खोदलेल्या खड्यात पाऊसाचे पाणी जमलेले होते. या डबक्यात तो तोल जावून पडल्याने ही दुर्घटना घडली. सर्वत्र शोधा शोध केल्यानंतर तो पाण्याच्या डबक्यात आढळून आला. कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास निरीक्षक रहेरे करीत आहेत.