नाशिक – कर्मयोगीनगर, तिडकेनगर, गोविंदनगर भागातील उद्यानांची दुरावस्था दूर करा; मोकळ्या भूखंडांवर उद्यान विकसित करा, वृक्षारोपण करा, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्याकडे केली. पंधरा दिवसांपूर्वी मुंडे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतले.
प्रभाग ३० मधील उद्यानांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. स्टेजची पडझड झाली आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी केली होती. उपायुक्त विजयकुमार मुंडे व उद्यान निरीक्षक प्रशांत परब, सुनील दातीर यांनी सोमवारी, २० जून २०२२ रोजी प्रियंका पार्क, तिडकेनगर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जगतापनगर येथील भारतरत्न राजीव गांधी, गोविंदनगर येथील विघ्नहर्ता या उद्यानांची, तसेच परिसरातील महापालिकेच्या रिकाम्या भूखंडांची पाहणी केली. उद्यानांची दुरावस्था दूर करण्यासाठी, तसेच रिकाम्या भूखंडांवर उद्यान विकसित करणे व वृक्षारोपण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. शशीकांत मोरे, बाबुलाल चौधरी, बाळासाहेब दिंडे, रमेश देशमुख, विनोद पोळ, संगिता देशमुख, वंदना पाटील, सुरेखा बोंडे, नीलिमा चौधरी, प्रज्ञा मालपुरे, अरुणा मालपुरे, मीरा सूर्यवंशी, संगिता चोपडे, सरीता पाटील, सुरेखा जाधव, सोनल नेहेते, अनिता चव्हाण, निर्मला बिरारी, लक्ष्मीबाई तिडके, सायली राजहंस, समृद्धी पाटील, परेश येवले आदींसह रहिवाशी हजर होते.