नाशिक – प्रभाग क्रमांक ३० मधील कर्मयोगीनगर, गोविंदनगर भागात महापालिकेकडून चेंबर दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे. प्रभाग ३० मध्ये रस्त्याच्या वर आणि खाली गेलेले चेंबर अपघातास कारणीभूत ठरू शकतात, दुचाकीस्वारांना मणक्यांचा त्रास होवू शकतो. हे चेंबर दुरूस्त करून ते रस्त्याला समांतर करावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्याकडे केली होती. महापालिका बांधकाम विभागाने शनिवारी कालिका पार्क, कर्मयोगीनगरमध्ये रणभूमी क्रिकेट मैदानाजवळ आणि रविवारी गोविंदनगर येथे हे चेंबर दुरुस्तीचे काम केले. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय डोंगरे, भालचंद्र रत्नपारखी, अशोक पालवे, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे विठ्ठलराव देवरे, गुलाब शिंदे, राधाकृष्ण जाधव, दिलीप निकम, बापुराव पाटील, मीना टकले, उज्ज्वला सोनजे, सुनीता उबाळे, शीतल गवळी, स्मिता गाढवे, रूपाली मुसळे, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, दिलीप दिवाणे, विनोद पोळ, सचिन राणे, मगन तलवार, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, अशोक पाटील, तेजस अमृतकर, हरिष काळे, बाळासाहेब दिंडे, पुरुषोत्तम शिरुडे, मनोज वाणी आदींनी महापालिकेचे आभार मानले आहेत.