शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे महापालिका आयुक्तांना निवेदन
नाशिक – प्रभाग २४ मधील गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण, संरक्षक भिंत बांधण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
गोविंदनगर येथील स्वर्गीय शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅकची अत्यंत दैन्यावस्था झाली आहे. संरक्षक तारेचे कुंपनही कोसळले आहे. ग्रीन जीमच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. ट्रॅक दुरुस्तीची आवश्यकता आहे याची दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन २८ ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले होते. दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. निधीअभावी काम रखडू नये यासाठी महापालिकेच्या पुरवणी किंवा सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात यावी, यासाठी १४ डिसेंबर २०२१ रोजी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने आयुक्तांना दुसरे निवेदन करण्यात आले. या आर्थिक तरतुदीतून जॉगिंग ट्रॅकचे संपूर्ण नूतनीकरण करावे, संरक्षक भिंत बांधावी, ग्रीन जिमच्या साहित्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गोविंदनगर, सद्गुरूनगर, जुने सिडको, सदाशिवनगर, खांडे मळा, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, उंटवाडी, जगतापनगर, बाजीरावनगर, कालिका पार्क, खोडे मळा, बडदेनगर, पांगरेनगर येथील रहिवाशांना हा ट्रॅक सोयीचा ठरणार आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. आर डी सर्कलजवळील काही भाग, इंडिगो पार्क ते नयनतारा सिटी-२ या भागातील उर्वरित ट्रॅक विकसित करण्यासाठीही निधीची तरतूद करावी, अशी मागणीही याच निवेदनात सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक, विनोद पोळ, संजय टकले, दिलीप दिवाणे, अनंत संगमनेरकर, मनोज वाणी, बाळासाहेब दुसाने, डॉ. शशीकांत मोरे, बापू आहेर, मनोज कोळपकर, प्रवीण शिंदे, राजेंद्र कानडे, राजेंद्र पाटील, संदीप धामणे, शैलेश महाजन, यशवंत जाधव, प्रल्हाद भामरे, नीलेश ठाकूर, बाळासाहेब राऊतराय, दीपक ढासे, दीपक दुट्टे, हरिष काळे, सचिन राणे, मंदार सडेकर, संजय बावीस्कर, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, वंदना पाटील, साधना कुवर, कांचन महाजन, प्रतिभा पाटील, नीलिमा चौधरी, पल्लवी रनाळकर, सरीता पाटील, सुनीता उबाळे, पोपट तिडके, आनंदा तिडके, नितीन तिडके, संजय तिडके, आशुतोष तिडके, मगन तलवार, मनोज पाटील, बन्सीलाल पाटील, बापू महाले, राहुल काळे, वैभव कुलकर्णी, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) आदींनी केली आहे.