शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचा इशारा
नाशिक – उंटवाडीतील तिडकेनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क या भागातील अंतर्गत रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने दिला आहे.
तिडकेनगर, कालिका पार्क, जगतापनगर, कर्मयोगीनगर या भागात काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. मात्र, याच भागातील काही अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे बाकी आहे. प्रियंका पार्कमध्ये तर एकाही रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. दरवर्षीप्रमाणे याही पावसाळ्यात याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. या सर्व रस्त्यांचे काम त्वरित सुरू करावे, यासाठी आज शहर अभियंता संजय घुगे यांची दैनिक ‘सामना’चे पत्रकार, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी भेट घेतली, रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन सादर केले.
शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), धवल खैरनार, उज्ज्वला सोनजे, माधुरी सडेकर, वंदना पाटील, साक्षी खैरनार, नीलिमा चौधरी, सुरेखा बोंडे, कल्पना सूर्यवंशी, साधना कुवर, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, डॉ. राजाराम चोपडे, अशोक पाटील यांच्यासह रहिवाशांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.