नाशिक – म्हसरुळ – बोरवड मार्गे येणा-या नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बसने कारला कट मारल्याचे कारण पुढे करत कारमधील लोकांनी सीटी बसच्या ड्रायव्हर व कंडक्टरला शनिवारी रात्री बेदम मारहाण केली. या दोघांना नाशिकच्या सिव्हिल हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे. यात एक महिला व काही तरुण हे मारहाण करत आहे. हे सर्व कारचे प्रवासी असल्याचे बोलले जात आहे.