जनतेचे आशीर्वाद शिवसेना कधीही विसरणार नाही – खा. राऊत
नाशिक – शिवसेनेला सतत ५५ वर्षे जनतेचा आशीर्वाद मिळत आहे. हा आशीर्वाद शिवसेना कधीही विसरणार नाही, अशी ग्वाही शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. उंटवाडीतील नंदिनी नदीवरील दोंदे पूल आणि सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळील पुलावर संरक्षक जाळी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ संजय राऊत यांच्या हस्ते शनिवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना ही एका कलावंताने स्थापन केली आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार हेही एक कलावंत आहेत, ते ह्या व्यासपीठावर हजर असल्याने आनंद होतोय, असे ते म्हणाले. नाशिकमध्ये राजकारण बाजूला ठेवून विविध क्षेत्रातील व्यक्ती विकासकामांमध्ये सहभागी होतात, हे चांगले आहे. पुणे ही सांस्कृतिकनगरी आहे. नाशिकही कमी नाही. साहित्यिक, कलाकार, लेखक या सगळ्यांचीच ही भूमी आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेचा शिवसेनेला नेहमीच आशीर्वाद मिळतो, हा आशीर्वाद शिवसेना कधीही विसरणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतात, त्यांचा आदर्श समोर ठेवून काम करा, शिवसेना घराघरात पोहचवा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘सामना’चे पत्रकार बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी प्रसाद दिला, आता जनता गायकवाड यांना आशीर्वाद देईल, असेही संजय राऊत म्हणाले.
नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी या दोन्ही पुलांवर संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी ३१ मे २०२१ रोजी केली होती. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दखल घेवून पर्यावरण निधीतून २४ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्यामुळेच हे काम मार्गी लागत असल्याचे बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी यावेळी प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागुल, विनायक पांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे, नगरसेवक प्रवीण तिदमे, श्याम साबळे, शिवानी पांडे, भगवान भोगे, सुभाष गायधनी, नाना पाटील, शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, विनोद पोळ, दिलीप दिवाने, श्याम अमृतकर, बन्सीलाल पाटील, शैलेश महाजन, मकरंद पुरेकर, मनोज वाणी, चंद्रकिशोर पाटील, सचिन राणे, मनोज कोळपकर, श्रीकांत नारखेडे, संग्राम देशमुख, बाळासाहेब राऊतराय, दीपक ढासे, कैलास भिंगारकर, यशवंत जाधव, सुरेश पाटील, मनोज पाटील, समीर सोनार, प्रतिभा वडगे, ज्योती वडाळकर, रुपाली मुसळे, वंदना पाटील, उज्ज्वला सोनजे, सुनीता उबाळे, संध्या बोराडे, संगिता नाफडे, शीतल गवळी, मंदा पाटील, छाया शिरोडे, सुरेखा बोंडे, कांचन महाजन, कविता राणे, पूजा महाजन, कल्पना पाटील, मीनाक्षी पाटील, भारती चौधरी, प्रथमेश पाटकर, संकेत गायकवाड (देशमुख), राहुल पाटील, हरिष काळे, मयुरेश सहाणे, प्रणव लोहारकर, जितेंद्र जैन, चंचल महाजन, गणेश पाटील आदी हजर होते.