नाशिक – कालिका पार्कमधील घरांजवळ लोंबकळणाऱ्या विद्युततारा भूमिगत करण्यासाठी आज वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या भागात पाहणी केली. याबाबत प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे सहाय्यक अभियंता प्रदीप गवई यांनी सांगितले.उंटवाडीतील कालिका पार्क भागातील रो-हाऊस आणि बंगल्यांच्या गॅलरीलगत ४४० व्होल्टेजच्या लोंबकळणाऱ्या विद्युततारा आहेत. यामुळे येथील रहिवाशांच्या जीविताला धोका असून, ते नेहमी भीतीच्या सावटाखाली राहतात. संभाव्य दुर्घटना होण्यापूर्वीच येथील विद्युततारा भूमिगत कराव्यात, नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करावे, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा केली होती. सहाय्यक अभियंता प्रदीप गवई, वायरमन दीपक शिर्के, किशोर वाघ, लाईनमन गोकुळ सोनवणे यांनी बुधवारी, १३ ऑक्टोबर २०२१ रोजी या भागात पाहणी केली. सात स्पॅन अर्थात गाळे, ट्रान्सफॉर्मर, डीपी यांची पाहणी करून मोजमाप केले. सुमारे अडीचशे ते तीनशे मीटर विद्युततारा भूमिगत कराव्या लागणार आहेत, असे त्यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येईल, तो अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, असे प्रदीप गवई यांनी सांगितले.
यावेळी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, सुलोचना पांडव, विनोद पोळ, बाळासाहेब दिंडे, नितिन सोनजे, शैला देशमुख, छाया चौधरी, सरला सोनवणे, विमल हिरे, राजश्री गांगुर्डे, सुनिता येवले, मनिषा सोनजे, कांता पोळ, आशालता काळे, सुनिता गाढवे, संगिता पवार, भाविका ठाकरे, संगिता थोरात, रमेश थोरात, अशोक गाढवे, सोमनाथ काळे, सोनू देशमुख, आकाश ठाकरे, पप्पू कदम, पंकज काळे यांच्यासह रहिवाशी हजर होते. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी रहिवाशांचे शिष्टमंडळ वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.