नाशिक – नाशिकच्या गोविंदनगर, तिडकेनगर, कर्मयोगीनगरसह नववसाहतींमध्ये पत्ता सापडण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. महापालिका शहर अभियंत्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यामुळे या भागात सतत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होईल. प्रभाग क्रमांक २४ व २५ मधील उंटवाडी, तिडकेनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगतापनगर, खांडे मळा, गोविंदनगर, प्रियंका पार्क, दत्त मंदिर, सद्गुरूनगर, बाजीरावनगर, नवीन तिडके कॉलनी, आर. डी. सर्कल, सदाशिवनगर आदी परिसर नव्याने विकसित होत आहे. येथे व्यवसाय वाढत असतानाच नागरी वस्तीही वाढत आहे. तेथे सतत वर्दळ असते, बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संबंधित भागातील नगर, कॉलनी, मुख्य व अंतर्गत रस्ते, लहान-मोठे चौक येथे जाताना नवीन व्यक्तींचा गोंधळ उडतो. पत्ता सापडणे अवघड होते, शोधण्यात वेळ जातो. परिसरातील व बाहेरील नागरिकांच्या सोयीसाठी या भागात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने महापालिका शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना बुधवारी, ६ ऑक्टोबर २०२१ रोजी निवेदन दिले आहे. सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, धवल खैरनार, संगिता देशमुख, दिलीप दिवाणे, श्याम अमृतकर, श्रीकांत नाईक, विनोद पोळ, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, अशोक पाटील, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, डॉ. सुनिल सोनार, डॉ. शशिकांत मोरे, पुरुषोत्तम शिरोडे, दीपक ढासे, संजय टकले, बापू आहेर, डॉ. राजाराम चोपडे, मनोज पाटील, दीपक दुट्टे, मनोज कोळपकर, दिगंबर लांडे, नितीन तिडके, बाळासाहेब राऊतराय, आशुतोष तिडके, तुषार मोरे, किरण काळे, हरिष काळे, राहुल पाटील, सचिन अमृतकर, प्रथमेश पाटील, सचिन राणे, ज्योती वडाळकर, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, वंदना पाटील, कांचन महाजन, सुनीता उबाळे, ज्योत्स्ना पाटील, मनिषा शिरोडे, अलका भुसारे, स्वाती गांगुर्डे, प्रगती साळी, अनिता पाटील, दिपीता काळे यांच्यासह रहिवाशांनी ही मागणी केली आहे.