शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचा उपक्रम
नाशिक – उंटवाडीतील कर्मयोगीनगरमध्ये कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करून परिसरातील हजारो भाविकांनी सर्व नियमांचे पालन करीत भक्तीमय वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला. शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या या उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल ६२५ गणेशमूर्तींचे, तसेच मोठ्या प्रमाणात निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
कर्मयोगीनगर, तिडकेनगर भागातील छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळेजवळ कृत्रिम तलाव आणि मूर्ती संकलन केंद्राची व्यवस्था करावी, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) आणि नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार येथे व्यवस्था करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवारी सकाळी ८ वाजता कृत्रिम तलावाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. रात्री ९ वाजेपर्यंत गणेशभक्तांचा या ठिकाणी ओघ सुरूच होता. उंटवाडी, पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, हेडगेवारनगर, जगतापनगर, कालिका पार्क, खांडे मळा, कर्मयोगीनगर, पाटीलपासुडी, गार्गी कॉलेज परिसर, तिडकेनगर, सद्गुरूनगर, आर.डी.सर्कल परिसर, खोडे मळा आदी ठिकाणाहून हजारो गणेशभक्तांनी येथे हजेरी लावली. अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात, सर्व नियमांचे पालन करून गणरायाला निरोप देण्यात आला. रात्री ९ वाजेपर्यंत ६२५ मूर्ती आणि एक ट्रॅक्टर निर्माल्य संकलित करण्यात आले होते. ते रात्रीच महापालिकेच्या स्वाधीन करण्यात आले.
बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, अशोक पाटील, संजय टकले, दीपक दुट्टे, दिलीप दिवाने, श्याम अमृतकर, बाळासाहेब राऊतराय, मनोज पाटील, प्रथमेश पाटकर, प्रथमेश पाटील, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, प्रल्हाद भामरे, बापू आहेर, संकेत गायकवाड (देशमुख), रूपेश सोनवणे, गणेश पाटील, हरिष काळे, अॅड. अमोल जाधव, सोपान माळी, गोपाळ तिडके, आशुतोष तिडके, सचिन जाधव, शैलेश महाजन, तुषार मोरे, परेश येवले, विजय कांडेकर, किरण काळे, राहुल काळे, घनश्याम सोनवणे, डॉ. राजाराम चोपडे, गोविंद गांगुर्डे, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, पुरुषोत्तम शिरोडे, मनोज बागुल, विजय शिरोडे, मयुर ढोमणे, मीना टकले, वंदना पाटील, संगीता देशमुख, धवल खैरनार, उज्ज्वला सोनजे, नीलिमा चौधरी, संगीता चोपडे आदींनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. परिसरातील रहिवाशी, सर्व गणेशभक्त आणि महापालिकेचे शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने आभार मानले आहेत.