नाशिक – एमजी रोडवरील राहुल ट्रेडर्स या कॉम्प्युटरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमुळे रहदारीच्या या रस्त्यावर एकच खळबळ निर्माण झाली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचे घटना कळताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.