शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश
नाशिक– उंटवाडीतील दोंदे पूल आणि सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळील पुलावर संरक्षक जाळीसाठी सुमारे २४ लाख ९८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदाही गुरुवारी, १९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश आले असून, यामुळे नंदिनी नदीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचे आभार मानण्यात आले आहेत. दोंदे पूल आणि सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळ गोविंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलांवरून नंदिनी नदीत मोठ्या प्रमाणात कचरा व घाण टाकली जाते. याला निर्बंध बसावा, प्रदूषण थांबण्यास मदत व्हावी यासाठी या दोन्ही पुलांवर संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी शिवसैनिक, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, चंद्रकिशोर पाटील, रवींद्र सोनजे यांच्या शिष्टमंडळाने ३१ मे २०२१ रोजी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.
कामाच्या मंजुरीसाठी बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी अडीच महिने सतत पाठपुरावा केला. आज गुरुवारी, १९ ऑगस्ट रोजी या कामाची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली. यामुळे येत्या काही दिवसात जाळी बसविण्याच्या कामाला सुरुवात होईल हे निश्चित झाले आहे. निलेश ठाकूर, यशवंत जाधव, दीपक दुट्टे, ज्ञानेश्वर महाले, व्ही. एस. पाटील, जितेंद्र जैन, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. सुनील चौधरी, संजय टकले, श्रीकांत नाईक, अशोक पाटील, संगिता देशमुख, ज्योती वडाळकर, उज्ज्वला सोनजे, डॉ. सुनीता ठाकूर, डॉ. शशिकांत मोरे, सचिन जाधव, सुरेखा बोंडे, साधना कुवर, आशुतोष तिडके, सचिन राणे, शैलेश महाजन, डॉ. प्रशांत वाणी, विनोद पोळ, मगन तलवार, मनोज पाटील, डॉ. सुनील सोनार आदींनी महापालिका, शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनचे आभार मानले आहेत. उंटवाडी, जगतापनगर, हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर, गोविंदनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, खांडे मळा या सर्वच भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नंदिनीचे सौंदर्यीकरण करा
जाळी बसविण्याच्या कामाला मंजुरी दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक २४ आणि २५ मधील नागरिकांच्या वतीने महापालिका आयुक्तांसह प्रशासनाचे आभार. या नदीपात्राची वेळोवेळी स्वच्छता करावी, गॅब्रीयन वॉल बांधावी, वेली, वृक्ष, फुलझाडांची तटबंदी करून नदीचे सौंदर्यीकरण करावे, अशी शिवसेनेची मागणी आहे.
– चारूशिला गायकवाड (देशमुख)